नगर – अनेक कार्यालयात, संस्थांमध्ये, संघटनामध्ये, बॅंकमध्ये काय चाललेले आहे? या सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक कमी दिसतात त्यामुळे सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज कामगार नेते श्रीमंत (तात्या) शितोळे यांच्या सारख्या चांगली कायशैलीने व ठोसप्रकारे काम करणाऱ्यांची समाजात गरज आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
कामगार नेते श्रीमंत (तात्या) शितोळे पाटील यांची पिंपरी चिंचवड सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी आण्णासाहेब म्हस्के रामभाऊ भुसाळ माजी अध्यक्ष प्रवरा सहकारी साखर कारखाना श्री. के. श्रीनिवान ग्रीव्हज इलक्ट्रिक बाईकचे एमडी व धर्मवीर संभाजीराजे बॅंकेचे संचालक संभाजी शिंदे, बाबासाहेब निर्मळ, विठ्ठल हंडोरे व जीकेन सिंटर्ड येथील कर्मचारी उपस्थित होते.