औसा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

औसा – लातूर व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज , दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता औसा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सभेचे संयोजक अरविंद पाटील-निलंगेकर यांनी दिली आहे.

महायुतीचे लातूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुधाकर शृंगारे व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही मतदार संघासाठी ही एकत्रीत सभा असून सुमारे 20 एकर क्षेत्रावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेस युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचीही उपस्थिती राहणार आहे. ही सभा व्हीव्हीआयपी असल्याने दोन्ही पक्षाचे नेते काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.