आजचे भविष्य ( मंगळवार, ११ मे २०२१)

मेष : महिलांना घरात जबाबदारीची भूमिका पार पाडावी लागेल. त्यामुळे कर्तुत्व अधिक प्रशंसनीय राहील.

वृषभ : तुमच्या मानी व अहंमन्य स्वभावाला थोडी मूरड घालावी लागेल. विद्‌यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल.

मिथुन : व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त कसा फायदा घ्यायचा ते ठरवा. नावलौकिक मिळवाल.

कर्क : विद्‌यार्थ्यांनी डोके शांत ठेवून संयमाने वागावे. नवीन योजना साकार करताना सर्वांचे सहकार्य लाभेल.

सिंह : नोकरीत कामांना गती मिळेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र असे काम हातून घडेल.

कन्या : महिलांना सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगतीपथावर राहणे शक्‍य होईल. विद्‌यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरी मिळेल.

तूळ : व्यवसायात नोकरीत अपेक्षित यश मिळेल. मनातील इच्छा आकांक्षा फलद्रुप होतील. सुवार्ता कळेल.

वृश्‍चिक : व्यवसायात कामांना मूर्त स्वरूप येईल. महत्वाचे करारमदार ठरतील. पैशाचा अतिमोह मात्र टाळा.

धनू : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना आरोग्याची उत्तम साथ मिळेल. अपूर्व संधी चालून येतील.

मकर : आर्थिक बाबतीत तुम्ही सतत विचार करता त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी करा.

कुंभ : दूरदृष्टी ठेवून आलेल्या संधीचा फायदा घ्या व पुढे जा. व्यवसायाची अनेक दालने तुम्हाला खुली होतील.

मीन : नोकरीत तूर्तास कोणताही बदल करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.