आजचे भविष्य (बुधवार, 23 जून 2021)

मेष : कामातील बेत गुप्त ठेवा. महिलांना नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत स्पृहणीय यश मिळेल.

वृषभ : व्यवसायात नवीन दिशा सापडेल. कामाचा विस्तार करण्याचे बेत मनात घोळतील.

मिथुन : नवीन कामे हाती घेताना त्याचा ताळेबंद करून मगच पुढे जा. आर्थिक येणे वसुलीवर लक्ष केंद्रित करा.

कर्क : नोकरीत स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.

सिंह : कामात अतिविश्‍वास घातक ठरेल. महिलांना मनास्वास्थ्य जपता येईल. प्रकृतीत उत्तम सुधारणा होईल.

कन्या : केलेल्या कामाचे समाधान मिळेल. तरुणांना जीवनसाथी भेटेल. “”दाम करी काम” या म्हणीचा प्रत्यय येईल.

तूळ : व्यवसायात कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल.

वृश्‍चिक : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत आमिष दाखवून सहकाऱ्यांकडून खुबीने काम करून घ्याल.

धनू : कामाचा ताण वाढेल. प्रवास घडेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. नवीन गुंतवणूक कराल.

मकर : महिलांनी कामात सावध दृष्टिकोन ठेवावा. प्रकृतीची काळजी घ्याल.

कुंभ : “”खाईन तर तुपाशी…..” असा बाणा राहील. ग्रहांची अनुकूलता लाभल्याने मनातील बेत साकार होतील.

मीन : व्यवसायात कामांना वेग येईल. मनावरचा ताणतणाव दूर होईल. बॅंका हितचिंतकांची मदत मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.