मेष : वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करून प्रगती करण्याचा मानस असेल. त्यात यश मिळेल.
वृषभ : बॅंक व वित्तीय संस्था इ. ची मदत खेळते भांडवल उभारणीसाठी होईल. कामे ओळखीतून मिळतील.
मिथुन : नोकरीत महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. स्वतः लक्ष घालून कामे पूर्ण कराल. अट्टहास ठेवू नका.
कर्क : सहकारी कामात मदत करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील.
सिंह : मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. धार्मिक कार्ये ठरतील व त्यात पुढाकार राहील.
कन्या : महिलांना मनःशांती लाभेल. तरुणांना प्रगतीच्या दिशा खुल्या होतील. त्यामुळे घोडदौड चांगली राहील.
तूळ : विश्वासार्हता पडताळून इतरांवर कामे सोपवलीत तर बरीच कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : व्यवसायात संमिश्र ग्रहमान राहील. जुने काम संपून नवीन काम हाती घ्याल.
धनू : बाजारातील चढउतारांकडे लक्ष देणे गरजेचे होईल. नोकरीत आपल्या मर्यादा ओळखून काम करा.
मकर : कोणत्याही गोष्टीची मागणी करताना वरिष्ठांचा मुड बघून करा. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल.
कुंभ : घरात सहजीवनाचा आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
मीन : कृतीवर भर दिल्याने कामे गती घेतील. तरुणांचा आनंद द्विगुणित करणारी घटना घडेल. पैशाची चिंता मिटेल.