आजचे भविष्य (बुधवार २० जानेवारी २०२१)

मेष : आशावादी रहाल. स्वप्ने साकार होतील. व्यवसायात ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी मिळेल.

वृषभ : फायदा मिळवून देणारी कामे मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल. अनपेक्षित लाभ होतील.

मिथुन : नोकरीत नवीन कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काम मिळेल. घरात शुभकार्याची नांदी होईल.

कर्क : वरिष्ठ मतलब साध्य करण्यासाठी आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत याची काळजी घ्या.

सिंह : आप्तेष्ट प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील. सर्व आघाडयांवर सज्ज रहा. प्रत्येक काम महत्त्वाचे असेल.

कन्या : व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित मांडल्याशिवाय सुरुवात करू नका. पैशाची चिंता मिटेल.

तूळ : कामे स्वतः हाताळून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्या. कमाई मनाप्रमाणे होईल.

वृश्‍चिक : नोकरीत गरजेनुसार कामांना अग्रक्रम राहील. मिळालेल्या सुखसुविधा उपभोगण्याकडे कल राहील.

धनु : प्रवासयोग संभवतो. घरात गृहसजावट, खरेदीचे मनसुबे ठरतील. वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.

मकर : आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील.मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या.

कुंभ : व्यवसायात विविध स्तरावरील व्यक्‍तींशी भेटीगाठी होतील. नवीन कल्पना मनात येतील.

मीन : पैशाचा ओघ राहिल्याने जुनी देणी देता येतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. पगारवाढ मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.