आजचे भविष्य (मंगळवार, 14 सप्टेंबर 2021)

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले. व्यवसायात बरकत होईल. मनोरंजनाकडे कल राहील. खर्च वाढेल.

वृषभ : कला क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष लाभ होईल. मानसन्मानाचे योग. अडचणींवर मात कराल. उलाढाल वाढेल.

मिथुन : आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवे हितसंबंध निर्माण होतील. कामात यश मिळेल. चांगली बातमी कळेल.

कर्क : जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. बौद्धिक परिवर्तन घडेल. अनेक कामे मार्गी लागतील.

सिंह : कामाचा ताण, दगदग वाढेल. कार्यात सहभागी व्हाल. पैशांची स्थिती समाधान देणारी आहे.

कन्या : कौटुंबिक जबाबदारी वाढेल. सुसंधी लाभेल. मनाप्रमाणे कामे होतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. यशप्राप्ती होईल.

तूळ : निर्णय योग्य घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल.

वृश्‍चिक : विचारपूर्वक निर्णय घ्या. लोकांशी समन्वय साधा.स्पर्धा नको. घरातील प्रश्‍नांकडे लक्ष द्या.

धनू : प्रयत्नांना वेग द्या. यश सोपे होईल.अपेक्षित यशप्राप्ती, नवीन कामाचा आनंद मिळेल.

मकर : प्रभाव पडेल. नोकरीत सुलभता जाणवेल.प्रवास योग संभवतो. सावधगिरी बाळगा.

कुंभ : गृहसौख्याचा आनंद घ्याल. स्वयंसिद्ध राहा.मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.

मीन : कामात सफलता मिळेल. नव्या क्षेत्राचा परिचय होईल.अनावश्‍यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.