आजचे भविष्य (मंगळवार, 2 मार्च 2021)

मेष : पैशाची चिंता मिटेल. वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. कामात नवीन सुधारणा कराल.

वृषभ : नोकरीत पूर्वी केलेल्या कष्टाचे कामाचे चीज होईल. नोकरीतच्या शोधात असणाऱ्यांना संधी नजरेस पडेल.

मिथुन : कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. सहकारी कामात मदत करतील. सुवार्ता कळेल.

कर्क : नोकरीत कामात बिनचूक राहून आजचे काम आजच पूर्ण करा. पैशाची तात्पुरती सोय होऊ शकेल.

सिंह : नोकरीत कोणाचीही मदत घेण्यापूर्वी त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. वातावरण बदलाने मानसिकता सुधारेल.

कन्या : कामाचा ताण जाणवणार नाही. जोडधंदयातून जादा कमाई होईल त्यामुळे पैशाची ऊब मिळेल.

तूळ : नोकरीत हातातील कामे वेळेत संपवा. काम नीट पडताळून बघून मगच वरिष्ठांपुढे घेऊन जा.

वृश्‍चिक : सहकारी कामात मदत करतील. नवीन काम करण्याची संधी मिळेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

धनु : मतलबापुरते नातेवाईक तुमचेकडे आशेने पाहतील तरी चार हात जरा लांबच. मौनव्रत ठेवणे गरजेचे होईल.

मकर : जोडधंदयातून विशेष लाभ होईल. घरात सुवार्ता कळेल. प्रगती व प्रकृतीबाबतची चिंता कमी होईल.

कुंभ : मानसिक समाधान लाभेल. कामातून तुमचे खास गुण नजरेस पडतील. नवीन ओळखी कामांमुळे होतील.

मीन : चांगल्या दर्जाचे काम करून वैशिष्ठय इतरांसमोर दाखवाल. जीवनात आनंदाची बातमी कळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.