मेष : आशावादी दृष्टिकोन ठेवून प्रत्येक काम हाती घ्याल. व्यवसायात कंटाळवाणे काम संपल्याने हायसे वाटेल.
वृषभ : रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरीत गरजेनुसार वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल.
मिथुन : जोडधंदा असणाऱ्यांना अचानक धनालाभाची शक्यता आहे. प्रतिष्ठा मिळेल. नोकरीची संधी चालून येईल.
कर्क : घरात तरुणांना नवीन मित्रमंडळींचे आकर्षण वाटेल. प्रवासाचे बेत ठरतील. कामाचे कौतुक होईल.
सिंह : महिलांना अंगी असलेले गुण दाखवण्याची संधी मिळेल. तरुणांना अपेक्षित जोडीदार भेटेल.
कन्या : “”अंथरुण पाहून पाय पसरा.” व्यवसायात नवीन योजनांना मूर्त स्वरूप देता येईल. नवीन कामे मिळतील.
तूळ : त्यामुळे जादा भांडवलाची उभारणी करावी लागेल. पैशाची सोय होईल. घरात लांबलेले कार्य ठरेल.
वृश्चिक : नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांनी त्यादृष्टीने वाटचाल करावी. मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवावा.
धनू : बोलण्याने जवळची माणसे दुरावण्याची शक्यता आहे. मानापमान दूर ठेवून आनंदात सहभागी व्हावे.
मकर : तरुणांनी स्वतःची ध्येय व उद्दिष्टे ठरवून त्याप्रमाणे प्रगती करावी. अतिधाडस सुद्धा करू नये.
कुंभ : साशंकता न ठेवता कामे करीत राहा. कामाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल.
मीन : व्यवसायात निष्णात व्यक्तींचा सल्ला आवश्यक तेव्हा घ्या. पैशाचा मोह टाळा. कुसंगत धरू नका.