आजचे भविष्य (मंगळवार,23 फेब्रुवारी 2021)

मेष : नोकरीत कामात गुप्तता राखा. शेवटी त्यावर तोडगा निघेल. घरात तडजोडीने कामे मार्गी लावा.

वृषभ : नोकरीत व्यवहारी दृष्टीकोन ठेवून काम करा. कोणतेही महत्वाचे निर्णय तूर्तास लांबणीवर टाका.

मिथुन : घरात काही कारणाने खर्च वाढतील. तरूणांना मनपसंत व्यक्तिंची निवड करता येईल.

कर्क : बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. घरात गरजेनुरूप खर्च होतील.

सिंह : तजवीज करून भांडवल उभारणी कराल. नोकरीत तुम्हाला कामानिमित्ताने सुखसुविधा मिळतील.

कन्या : जोडधंदयातून वरकमाई होईल. घरात कार्यक्रमा निमित्ताने आप्तेष्टांचा सहवास लाभेल.

तूळ : कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. घरात आप्तेष्ट नातेवाईक यांना बोलावून गेट टुगेदर घ्याल.

वृश्‍चिक : पैशाची चिंता राहील. त्यासाठी बॅंका, हितचिंतक यांचेकडून कर्ज घ्याल. नातेवाईक आप्तेष्ट भेटतील.

धनु : नोकरीत महत्वाच्या पदासाठी तुमची नेमणूक होईल. अपेक्षेपेक्षा चांगले रिझल्ट सहकाऱ्यांकडून मिळतील.

मकर : मिळणाऱ्या सुखसुविधांचा गैरवाजवी वापर करावासा वाटेल. घरात एखादया व्यक्तिंचे हट्‌ट पूरवावे लागतील.

कुंभ : जादा काम करून जादा भत्ते व पैसे मिळतील. नोकरीत नवीन विचारांचा प्रभाव राहील.

मीन : घरात आनंदाचे प्रसंग घडतील. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.