आजचे भविष्य (मंगळवार,20 एप्रिल 2021)

मेष :  बदलीसाठी सुसंधी चालून येईल. कामात रस वाटेल. महिलांना अंगी असलेले कलागुण दाखवता येतील.

वृषभ: मनाप्रमाणे कामे झाल्याने आनंद मिळेल. प्रवास घडेल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. दानधर्म हातून घडेल.

मिथुन : अनुकुल घटनांची नांदी होईल. यश नजरेच्या टप्प्यात आल्याने आनंद द्विगुणीत होईल.

कर्क :  व्यवसायात उलाढाल वाढेल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी वसुल होतील.

सिंह :  नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. कामाची संधी मिळेल. तब्येतीचीही काळजी घ्या.

कन्या :  अपेक्षित पत्रव्यवहार होतील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल.

तूळ :  घर सजावट व दुरुस्ती यात बराच वेळ जाईल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे विशेष जागरुक रहावे लागेल.

वृश्‍चिक :  कामानिमित्ताने सवलती मिळतील त्याचा गैरफायदा घेऊ नका. छोटा प्रवास घडेल. उधार उसनवार टाळ

धनू : जशी कामाची गरज असेल तसे कामाचे नियोजन कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कराल.

मकर : आशा व निराशा या दोन्हींचा अनुभव येईल. आनंदाची बातमी नवीन आशा पल्लवित करेल.

कुंभ : एखादी घटना मन साशंक बनवेल. व्यवसायात कामाची योग्य आखणी करुन कामे वेळेत संपवा.

मीन : व्यवहार चातुर्यामुळे काही क्षेत्रात उत्तम यश मिळेल. नोकरदार व्यक्तिंनी तापट स्वभावावर आळा घालावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.