मेष : शब्दाला मान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील. पैशाची ऊब मिळेल. कामे मार्गी लागतील.
वृषभ : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल. कष्टाच्या प्रमाणात यश. दिलेला शब्द पाळा.
मिथुन : मनपसंत साथ मिळेल. कामे गती घेतील. वरिष्ठ खूश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.
कर्क : जिद्द वाढेल. अचूक निर्णय घ्याल. मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.
सिंह : नशीब साथ देईल. सुवार्ता कळेल. पैशाची ऊब मिळेल. सुखासिन दिवस.
कन्या : खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा. सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.
तूळ : नवीन कामे मिळतील. अर्धवट कामे गती घेतील. पैशाची चिंता मिटेल. मानमरातब व प्रतिष्ठा मिळेल.
वृश्चिक : नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. हातून चांगली कामगिरी केल्याचा आनंद मिळेल.
धनू : परदेशव्यवहार-परदेशमगनाच्या कामांना गती येईल. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल.
मकर : आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योगही येतील.
कुंभ : विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. आरोग्य चांगले राहील. सामाजिक कामात विशेष सहभागी व्हाल.
मीन : व्यवसायात माणसांची पारख खुबीने करून कामात उपयोग करून घ्याल. आर्थिक बाजू भक्कम राहील. सुवार्ता कळेल.