मेष :नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. धनप्राप्तीचे योग येतील. नवीन ओळखीतून फायदा होईल.
वृषभ : महिलांना सुवार्ता कळेल. मुलांची प्रगती व प्रकृतीबाबतीतील चिंता मिटेल. प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन : राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. अभ्यासात पूरक ग्रहमान. कामा निमित्ताने प्रवास घडेल.
कर्क : व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ते बदल कराल. यशाची मदार तुमचेवर राहील. सुवार्ता कळेल.
सिंह : नवीन कामे मिळतील. नोकरदार व्यक्तिंनी सहकाऱ्यांवर विसंबून न राहणेच चांगले. मानापमान बाळगू नये.
कन्या : सामाजिक, धार्मिक कार्यात मात्र प्रगती होईल. कामात लवचिक धोरण ठेवले तर विशेष फायदा होईल.
तूळ : पैशाच्या व्यवहारात चोखंदळ रहाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल.
वृश्चिक : जुनी येणी वसुल होतील. देणी देता येतील. त्यामुळे तणाव कमी होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी.
धनू : नोकरीत थोडी कळ सोसलीत तर परिस्थितीत बदल होईल. मनाप्रमाणे कामे होतील ही अपेक्षा ठेवू नका.
मकर : महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक उत्कर्ष होईल. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
कुंभ : व्यवसायात हरतऱ्हने लाभ होतील. विचार व कृती यांचा समन्वय साधून रेंगाळलेली कामे मार्गी लावाल.
मीन : मित्रमंडळी आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे.