आजचे भविष्य (गुरूवार, 4 मार्च 2021)

मेष : या सप्ताहात तुम्हाला माणसांची पारख चांगली कळेल. स्वप्न व सत्य यातील फरकही लक्षात येईल.

वृषभ : महत्वाचे ग्रह अनुकुल आहेत तेव्हा फायदा घ्या. कामांना प्राधान्य देऊन त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करा.

मिथुन : केलेल्या कामाचे समाधान मिळेल. सर्वजण कौतुकही करतील. त्यामुळे कष्टाचे चीज होईल.

कर्क : तुमचे सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात पूर्वी योजून घेतलेल्या निर्णयाचा लाभ होईल.

सिंह : बराच काळ तुमची झालेली गैरसोय कमी होईल. व्यवसायात अडचणींवर मात करुन प्रगती कराल.

कन्या : कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही हे लक्षात येईल त्यामुळे जे आहे फायदा मिळवण्याकडे कल राहील.

तूळ : कामात बदल करुन विस्तार करण्याचा विचार असेल आवश्‍यक वाटल्यास मध्यस्थांचा उपयोग होईल.

वृश्‍चिक : या सप्ताहात मिळालेल्या संधीचे सोने करा. जास्तीत जास्त लाभ घेण्याकडे कल राहील.

धनु : कामाचे वेळी काम करुन इतर वेळी जीवनाचा पूरेपूर आस्वाद घेण्याकडे कल राहील.

मकर : बराच काळ रेंगाळलेली कामे तातडीने हाती घेवून संपवा. त्याला फाटे फुटतील व तुमची चिडचिड होईल.

कुंभ : व्यवसायात कामात आवश्‍यक व योग्य व्यक्तिंकडून सहकार्य मिळाल्याने तुमचा कामाचा हुरूप वाढेल.

मीन : भरपूर उत्साह देणारे ग्रहमान आहे. स्वतःचे कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.