मेष : आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत अधिकाराचा योग्य वापर कराल. सहकारीही कामात मदत करतील.
वृषभ : तुमचा आत्मविश्वास वाढेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद उपभोगता येईल.
मिथुन : सद्विचार व सकृत्ये हातून घडतील. तरुणांनी मनपसंत जीवनसाथी शोधावा. यश येईल.
कर्क : विद्यार्थ्यांना स्पर्धा जिंकणे सहज सोपे जाईल. ग्रहांची मर्जी राहील. कामात वाढ होईल.
सिंह : व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. पूर्वी केलेल्या कामाचा फायदा आता होईल. स्वप्ने साकार होतील.
कन्या : नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळल्याने तुमची पत वाढेल.
तूळ : सामूहिक कामात प्रतिष्ठा मिळेल. घरात महिलांचा मूड जरा वेगळाच असेल. विश्रांती घेण्याकडे कल राहील.
वृश्चिक : आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद वाटेल. शुभकार्ये ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्साह टिकून राहील.
धनू : रेंगाळलेली व अर्धवट राहिलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील.
मकर : तुमचा दृष्टिकोन विशाल असेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील.
कुंभ : मानसिक समाधान लाभेल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. घरात खर्च वाढला तरी आवश्यक गोष्टींसाठीच असेल.
मीन : महिलांना मनाजोगती खरेदी करता येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.