आजचे भविष्य (गुरुवार, २९ जुलै २०२१)

मेष :तुमचा उत्साह द्विगुणीत करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. प्रवास घडेल.

वृषभ :पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आर्थिक स्वरुपात मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. खर्च वाढेल.

मिथुन : नोकरीत कामात तत्पर रहाल. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. जादा सवलती व भत्ते मिळतील.

कर्क : महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कुटुंबासमवेत छोटा प्रवास घडेल. गृहसौख्य आनंद उपभोगाल.

सिंह :  कामाचे वेळी काम इतर वेळी आराम असा पवित्रा राहील. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लावाल.

कन्या : जुनी येणी वसुल होतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. अभ्यासात प्रगती होईल.

तूळ : नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. महत्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल.

वृश्‍चिक :महिलांना बाहेरची कामे करण्यात रस वाटेल. घरात नातेवाईक पाहुण्यांची ये-जा राहील.

धनू :नोकरदार महिलांना सुसंधी मिळेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. मनपसंत जीवनसाथी भेटेल.

मकर : आर्थिक परिस्थितीही समाधानकारक राहील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. कामाचा विस्तार वाढवाल.

कुंभ :नोकरीत महत्वाचे करारमदार होतील. वरिष्ठ महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील.

मीन : जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

===============

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.