-->

आजचे भविष्य (गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021)

मेष : तुमच्या उत्साही स्वभावाला खतपणी घालणारे ग्रहमान लाभेल. नवीन कामे मिळतील.

वृषभ : वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल.

मिथुन : पैशाची चिंता मिटेल. नोकरीत स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.

कर्क : नोकरीत उद्‌दीष्ट डोळयासमोर ठेवून प्रगती राहील. कष्टाशिवाय काहीही सहजसाध्य नाही हे लक्षात येईल.

सिंह : कामात प्रगती होण्यासाठी वेगळे प्रयत्न कराल. तुम्ही जे काम कराल त्यातून तुमची प्रतिमा निर्माण होईल.

कन्या : नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा वापर योग्य कारणासाठीच करा. अतिविश्‍वास ठेवू नका.

तूळ : प्रतिष्ठा व मानमरातब वाढवणारे काम हातून घडेल. मानसिक समाधान मिळेल. घरात मोठी खरेदी होईल.

वृश्‍चिक : नोकरीत ध्येय धोरणे ठरवून वाटचाल कराल. उद्‌दीष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

धनु :  कामासाठी जादा सुविधा मिळतील. पैशाची स्थिती सुधारल्याने खरेदी व प्रवास यांचा आनंद घेता येईल.

मकर : योजना कार्यान्वित करण्याचा मानस राहील. नोकरीत वरिष्ठ पूर्वी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतील.

कुंभ :  कामे दृष्टीक्षेपात येतील ती मिळवण्यासठी हितचिंतकांची मदत घ्या. अपेक्षित कामे प्रगतीपथावर राहतील.

मीन : नोकरीत केलेल्या कामाचे श्रेय लगेच मिळणार नाही. घरात स्वतःची हौस पूरवून घ्याल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.