-->

आजचे भविष्य ( गुरुवार, दि. ११ फेब्रुवारी २०२१)

मेष : आशावादी रहाल. व्यवसायात कामाचा हुरूप वाढेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवाल.

वृषभ : पैशाची आवक समाधान देणारी असेल. नवीन कामे मिळतील. वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल.

मिथुन : नोकरीत वेगळ्या कामामुळे तुमच्या दैनंदिनीवर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ होईल.

कर्क : हटवादी स्वभावावर नियंत्रण ठेवून सामंजस्याने वागावे लागेल. घरात जुने प्रश्‍न पुन्हा डोके वर काढतील.

सिंह : तडजोडीने प्रश्‍नांची उकल करा. वरिष्ठांच्या सल्ल्याचा महत्त्वाचे निर्णय घेताना फायदा होईल.

कन्या : या सप्ताहात तुम्ही आनंदी व उत्साही रहाल अवघड कामात बेधडकपणे काम करून यश मिळवाल.

तूळ : व्यवसायात योग्य व्यक्‍तींचे सहकार्य मिळेल. कामांना गती येईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील.

वृश्‍चिक : पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आत्मविश्‍वास वाढेल. कामात मदत करतील.

धनु : तुमचा सक्रिय पाठिंबा व सल्ला उपयोगी पडेल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. अपेक्षित बातमी कळेल.

मकर : विद्यार्थ्यांना तणावमुक्‍त अभ्यास करता येईल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. महिलांना विरंगुळा लाभेल.

कुंभ : नवीन उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून वाटचाल कराल. व्यवसायात आर्थिकस्थिती समाधानकारक राहील.

मीन : नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहाल. नोकरीत कामाच्या पद्धतीत बदल होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.