मेष :”अंथरूण पाहून पाय पसरा” व्यवसायात यश मिळालेच पाहिजे हा अट्टहास धरू नका.
वृषभ : व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कृती करा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. अतिविश्वास टाळा.
मिथुन :नोकरीत स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत.
कर्क : घरात स्वतःचा हट्टी स्वभाव नडेल. इतरांचे विचारही ऐकून घ्या. व मगच तुमचे मत मांडा.
सिंह :वैचारिक मतभेद मन कलुषित करेल. सारासार विचारानेच कृती करा. महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे.
कन्या :””रात्र थोडी सोंगे फार” अशी स्थिती तुमची असेल. घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल.
तूळ :कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन ध्येयधोरणे स्वीकाराल.
वृश्चिक : कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कृती कराल. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करा.
धनू : कोणतीही गोष्ट करताना गोंधळून न जाता शांतचित्ताने पुन्हा डोके वर काढतील. डोक्यावर बर्फ ठेवा.
मकर :तरुणांनी अयोग्य संगत धरू नये. दिलेला शब्द पाळा व कृती आणि विचार यांच्यात एकवाक्यता ठेवा.
कुंभ : व्यवसायात परिस्थितीशी मिळते जुळते घ्यावे लागेल. कामात लवचिकता आणून निर्णय घ्यावे लागतील.
मीन : पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेऊ नका. नुकसान तुमचेच होईल. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील.