-->

आजचे भविष्य (रविवार,७ फेब्रुवारी २०२१)

मेष : नशिबांची साथ मिळेल. व्यवसायात अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. पैशाची वसुली होईल.

वृषभ : नवीन कामे मिळतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्व कळून येईल. कामाचा फायदा होईल.

मिथुन : शुभकार्ये ठरतील.कामाचा तणाव कमी झाल्याने मनोकामना सफल होईल. आरोग्याची चिंता मिटेल.

कर्क : वातावरण आनंदी राहील. गृहसौख्याचा उपभोग घ्याल.केलेल्या श्रमाचे चीज होईल. वरिष्ठांची मर्जी राहील.

सिंह : व्यवसायात जमा खर्च समसमान होईल. तरीही समाधान मिळेल. नोकरीत आर्थिक आवक वाढेल.

कन्या : नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील परंतू सही करण्याची तूर्तास घाई नको. पाहुण्यांची ये जा राहील.

तूळ : घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळाल. कामासाठी जादा सवलती व अधिकार मिळतील.

वृश्‍चिक : वेगळया कामासाठी निवड होईल. घरात महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दयावे लागेल.

धनु : भावनाप्रधान तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे मानसिकता जपा. घरात कामात वेळ जाईल.

मकर : तुमच्या कामाची जिद्द दांडगी राहील. व्यवसायात कामात अडथळे आल्याने काही बदल करावा लागेल.

कुंभ : फार मोठी उडी न घेता जमिनीवर पाय रोवून उभे राहा. व्यवसायात एक प्रकारचा तणाव जाणवेल.

मीन : घर व व्यवसाय या दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. बॅंक व कर्जे घेऊन कामे कराल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.