-->

आजचे भविष्य (रविवार, 21 फेब्रुवारी 2021)

मेष : व्यवसायात नव्या उमेदीने कामाला लागाल. पैशाची चणचण दूर करण्यासाठी प्रयत्न केलात तर यश येईल.

वृषभ : व्यवसायात कामाची वाटचाल योग्य रितीने करण्यासाठी नवीन व्यक्तिंशी संपर्क साधाल.

मिथुन : अटी नियमांचा बारकाईने अभ्यास करा व निष्णात व्यक्तिंचा सल्ला घ्या. पैशाचे व्यवहारात चोख रहा.

कर्क : व्यवसायात प्रगतीला वेग देण्यासाठी काहीतरी वेगळे करावेसे वाटेल. त्यादृष्टीने पावले उचलाल.

सिंह : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुप्तपणे स्पर्धकांची खबरबात ठेवावी लागेल. आत्मिक बळ मिळेल.

कन्या : जाहिरात व प्रसिद्‌धी माध्यमांचा वापर करूनउलाढाल वाढवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळाल.

तूळ : व्यवसायात मोठी उद्‌दीष्टे डोळयासमोर ठेवून वाटचाल कराल. तुमच्या कामामुळे बाजारातील प्रतिमा उंचावेल.

वृश्‍चिक : तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे.केलेल्या कामाचे समाधान मिळेल.

धनु : व्यवसायात बाजारातील चढउतार तुमच्या फायदयाचे ठरतील. वृद्‌धांना लांबच्या प्रवासाचे योग येतील.

मकर : पैशाचे व्यवहारात सजग वृत्ती ठेवाल. महत्वाच्या व्यक्तिंना भेटणे, चर्चा करणे इ. गोष्टींना प्राधान्य राहील.

कुंभ : व्यवसायात पूर्वी चांगले काम करून ठेवल्याचा फायदा होईल. नवीन वर्तुळात राहण्याचा योग येईल.

मीन : व्यवसायात गरजेप्रमाणे पैसे खर्च कराल. एखादी मोठी संधी नजरेच्या टप्प्यात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.