-->

आजचे भविष्य (रविवार, 14 फेब्रुवारी २०२१)

मेष : घरात वादाचे मुद्‌दे टाळावेत. रेंगाळलेल्या कामांना गती येईल. हितचिंतकांची मदत मिळेल.

वृषभ : व्यवसायात नवीन कामांना मुहूर्त लाभेल. नवीन बोलणी व करार होतील. पैशाची तजवीज करावी लागेल.

मिथुन : नोकरीत बदल किंवा बदलीची शक्‍यता आहे. सभोवतालच्या व्यक्तिंशी सांभळून वागा.

कर्क : काही महत्वाचे निर्णय घ्याल. पैशाचे गणित चुकण्याची शक्‍यता आहे तरी वायफळं खर्चावर बंधन ठेवावे.

सिंह : महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. अध्यात्मिक प्रगती करावी. स्वतःहून कामे ओढवून घेऊ नका.

कन्या : कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी योग्य वेळी विश्रांत घ्या. कामाचे मानसिक समाधान मिळेल.

तूळ : व्यवसायात कामाचा विस्तार वाढेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील.

वृश्‍चिक : कामाचा आनंद मिळेल. वरिष्ठ खुष होतील. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल. सुवार्ता कळेल.

धनु : मनोबल उंचावेल. प्रकृतीच्या सर्व तक्रारी संपतील. विचार कमी करून कृती केलीत तर फायदा तुमचाच होईल.

मकर : नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामासाठी तुमची खुशामत करतील तरी बळी पडू नका.

कुंभ : प्रकृतीची हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्या. घरात पूरेशी विश्रांती घेऊन कामे करा. अतिविचार नको.

मीन : व्यवसायात कामाचे नियोजन कामाचा भार हलका करेल. आप्तेष्ठ नातेवाईकांच्या भेटीने आनंद मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.