आजचे भविष्य ( रविवार, 8 ऑगस्ट 2021)

मेष : आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील. मनासारखे यश मिळेल. कर्तव्यदक्ष राहाल.

वृषभ : धावपळ कमी करा. कामाचे विभाजन करा. जादा कमाई करता येईल. मनसोक्‍ती     भटकंती कराल.

मिथुन : राग आवरा. शब्दाला लगाम ठेवा.कामाचे नियोजन करा. पैशाची सोय होईल.

कर्क :  प्रवास कराल. नवीन ओळखी होतील.ओळखीतून कामे मिळतील. कष्टाच्या प्रमाणात यश.

सिंह : आर्थिक बळ वाढेल. नवीन कामे मिळतील. सडेतोड बोलत कामे मिळवा. कामाची चिंता नसेल.

कन्या : ओळखीतून कामे मिळतील. नशीब साथ देईल. निर्णय योग्य ठरतील. योग्य पावले उचलाल.

तूळ  : शब्दाला मान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील. पैशाची ऊब मिळेल. कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक :  अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल. कष्टाच्या प्रमाणात यश. दिलेला शब्द पाळा

धनू : मनपसंत साथ मिळेल. कामे गती घेतील. वरिष्ठ खूश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.

मकर : जिद्द वाढेल. अचूक निर्णय घ्याल. मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.

कुंभ :  नशीब साथ देईल. सुवार्ता कळेल.पैशाची ऊब मिळेल. सुखासीन दिवस.

मीन : खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा. सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.