मेष : महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन वेळेत ती पूर्ण करावी लागतील. पैशाची चिंता मिटेल.
वृषभ : कोणालाही शब्द देताना जरा जपून नाहीतर तुम्हीच शब्दात अडकण्याची शक्यता आहे.
मिथुन : व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तिंचा सल्ला घ्या. जमेल तेवढे काम करा.
कर्क : व्यवसायात आश्वासन देताना त्याच्या परिणामांचा विचार आधी करा. कामातील बेत गुप्त ठेवावेत.
सिंह : कामाच उत्साह राहील. आवश्यक त्या भांडवलाची सोय झाल्याने कामांना गती येईल.
कन्या : जेवढे काम जास्त तेवढा मोबदला जास्त असा रेशो असेल. भांडवलाची तरतूदही होईल.
तूळ : अपेक्षित व्यक्तिंकडून मदतीचे आश्वासन मिळेल. कामाचे नियोजन करुन कामे सहकाऱ्यांवर सोपवा.
वृश्चिक : व्यवसायात पैसे व प्रतिष्ठा यांचे महत्व वाढेल. परदेश व्यवहारातून चांगले पैसे मिळतील.
धनु : ग्रहांची मर्जी तुमच्यावर असल्याने कामात उत्साह वाढेल. पैशाच्या व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा.
मकर : पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नवीन हितसंबंध जोडले जातील. कामात त्यांची मदत मिळेल.
कुंभ : व्यवसायात कामाची घडी नीट बसवण्याकडे लक्ष राहील. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा.
मीन : व्यवसायात भावूक न बनता सावधतेने काम करा. सभोवतालच्या व्यक्तिंवर फारसे अवलंबून राहू नका.