आजचे भविष्य (शनिवार, 25 सप्टेंबर 2021)

मेष :भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दयाल. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कामे मार्गी लावाल.

वृषभ : कामात महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. पैशाची तजवीज हितचिंतकांच्या मदतीने होईल.

मिथुन : नोकरीत तुमच्या वागण्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

कर्क : कामातील बेत गुप्त ठेवा. अतिस्पष्टवक्तेपणा टाळा. उधार उसनवार देऊ नका. थोडे सबुरीचे धोरण ठेवावे.

सिंह : झेपेल तेवढेच काम करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. नोकरदार महिलांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे.

कन्या : सलोख्याचे संबंध ठेवावेत. नशिबांची साथ राहील. व्यवसायात मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील.

तूळ : नवीन कामे मिळतील. अर्धवट कामे गती घेतील. पैशाची चिंता मिटेल. मानमरातब व प्रतिष्ठा मिळेल.

वृश्‍चिक : नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. हातून चांगली कामगिरी केल्याचा आनंद मिळेल.

धनू : परदेशव्यवहार-परदेशमगनाच्या कामांना गती येईल. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल.

मकर : आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योगही येतील.

कुंभ : विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. आरोग्य चांगले राहील.सामाजिक कामात विशेष सहभागी व्हाल.

मीन : व्यवसायात माणसांची पारख खुबीने करुन कामात उपयोग करुन घ्याल. आर्थिक बाजू भक्‍कम राहील. सुवार्ता कळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.