आजचे भविष्य ( शनिवार, दि. १ मे २०२१)

मेष : नोकरीत कामात तत्पर रहा व मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उचला.

वृषभ : नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.

मिथुन :  नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. नवीन पदभार स्विकाराल.

कर्क : लवचिक धोरण ठेवलेत तर सर्वांशी संबंध सलोख्याचे राहतील. घरात महिलांची नवीन खरेदी होईल.

सिंह : नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठराल.

कन्या : आर्थिक व्यवहारात चोखंदळ रहाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल.

तूळ : पैशाचे व्यवहारात गाफील राहू नका. जोडधंद्यातूनकमाई होईल.

वृश्‍चिक : महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन कराल.

धनू : व्यवसाय इप्सित साध्य करण्याचा चंग बांधाल. हाती घेतलेले काम तडफेने पूर्ण कराल.

मकर : कामाचा ताण वाढला तरी कर्तव्यात कसूर करु नका. यश हमखास मिळेल.

कुंभ : फायद मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. नोकरीत आळस झटकून कामे उरका.

मीन : विद्‌यार्थ्यांनी भरपूर श्रम भरपूर यश हे लक्षात ठेवावे. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पावले टाका.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.