मेष : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम केलेत तर समाधान मिळेल.
वृषभ : पैशाच्या मोहापासून लांब राहिलात तर त्रास होणार नाही. कामात गुप्तता राखलीत तर लाभ होईल.
मिथुन : घरात डोके शांत ठेवून विचार कराल. वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे मन आनंदी राहील.
कर्क : कामामुळे मान व प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य सुधारेल. मनाला जे योग्य वाटेल तोच निर्णय घ्याल.
सिंह : व्यवसायात काही ठोस निर्णय घेऊन कार्यवाही कराल. आर्थिक सुधारणा करण्याकडे कल राहील.
कन्या : विचार व कृती यांची योग्य सांगड घालून कामे हातावेगळी कराल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध रहा.
तूळ : कामात दक्ष रहा. तुमच्या स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.
वृश्चिक : घरात वादाचे प्रसंग टाळा. सामंजस्याने प्रश्नांची उकल करा. महिलांनी विनाकारण धावपळ दगदग करू नये.
धनु : तुमचा आत्मविश्वास उत्तम असल्याने तुम्ही कामात पुढाकार घेऊन कामे कराल. चिंतनात वेळ घालवावा.
मकर : आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. त्यामुळे मात्र उडी नको. आवडता छंद जोपासता येईल.
कुंभ : तुमच्या वागण्या बोलण्याने हितसंबंध बिघडणार नाहीत. याची खबरदारी घ्यावी. चांगली बातमी कळेल.
मीन : कामाबाबतीत कोणी डिवचले तर ते तुम्हाला सहन होणार नाही. वरिष्ठांशी मनातील बेत व्यक्त करा.