आजचे भविष्य (शनिवार, 27 फेब्रुवारी 2021)

मेष : कामाचे व वेळेचे नियोजन करून घर व व्यवसाय नोकरीत आघाड्या सांभाळाव्या लागतील.

वृषभ : स्वतः जीवनाचा आस्वाद घेऊन त्यात सभोवतालच्या व्यक्तिंनाही त्यात सामील करून घ्याल.

मिथुन : एखादया गोष्टीचा साकल्याने विचार करून मगच ती हाती घ्याल. कामात सातत्यता ठेवणे गरजेचे आहे.

कर्क : व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल व ते मित्रत्वाची भाषा बोलतील. प्रियजनांचा सहवास मिळेल.

सिंह : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. एखादया कामातील यशाचे स्वरूप लक्षात येईल.

कन्या : सध्या ग्रहमान अनुकूल असल्याने तुमचे इरादे बुलंद राहतील. कामांना गती मिळेल.

तूळ : कामात चोखंदळ राहून कामे मिळवा. कामात सातत्यता टिकवून ठेवून नवीन कामांचे नियोजन करा.

वृश्‍चिक : सप्ताहात तुमच्या अंगी असलेल्या गुणांचा व कौशल्याचा योग्य वापर करून प्रगती साधा.

धनु : येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा इरादा बुलंद राहील. कामातील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

मकर : व्यवासायात ज्या कामात दिरंगाई झाली होती ती कामे झपाटयाने पूर्ण होतील.

कुंभ : आळस झटकून कामाला लागाल. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य लाभेल.

मीन : तुमच्या हौशी व आनंदी स्वभावात पूरक ग्रहमान लाभत आहे. नवीन करारमदार होतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.