-->

आजचे भविष्य (शनिवार, 20 फेब्रुवारी 2021)

मेष :  महत्वाचे ग्रह शुभ असल्याने चांगली घटना घडेल. अडचणींवर मात करण्याची जिद्‌द निर्माण होईल.

वृषभ :  कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. विद्‌यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येईल.

मिथुन : केलेल्या कष्टाचे निश्‍चित स्वरूपात फळ देणारा सप्ताह आहे. त्यासाठी मात्र दगदग धावपळ करावी लागेल.

कर्क : कामाचे वेळी काम करून इतर वेळी मजा कराल. कर्तव्याला प्राधान्य राहील. स्वयंसिद्‌ध राहा.

सिंह : एखादी सुवार्ता तुम्हाला ताजेतवाने करेल व सकारात्मक पावले उचलण्यास उद्‌युक्त करेल.

कन्या :  ग्रहांची साथ मिळेल. तुमचे विचार कृतीत उतरवण्यासाठी ते मदत करतील.

तूळ :  एकाच वेळी वेगवेगळया आघाडयांवर सफलता प्राप्त करता येईल. नोकरीत विशेष अधिकार मिळतील.

वृश्‍चिक :  ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पहात होता त्या गोष्टी नजरेच्या टप्प्यात येतील.

धनु :  कामाचा लाभ मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहाल. घरात तरूणांचे विवाह ठरतील.

मकर :  व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्यापूर्वी निष्णात व्यक्तिंचा सल्ला घ्याल.

कुंभ :  सध्या ग्रहांची कृपादृष्टी आहे त्यामुळे मान, प्रतिष्ठा, पैसे एकाच वेळी मिळण्याचे भाग्य लाभेल.

मीन : तुमच्या रसिक व हौशी स्वभावानुसार तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्याल. पैशाची चिंता नसेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.