मेष : तुम्ही तुमचे काम व्यवस्थित पार पाडू शकाल व कमी श्रमात जास्त यश मिळवाल. पैशाची तजवीज होईल.
वृषभ : महिलांना घरात इतर व्यक्तींच्या गरजा पुरवताना धांदल होईल. यशप्राप्तीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
मिथुन : ग्रहांची मर्जी तुमच्यावर नाही, त्यामुळे ज्या कामांची पूर्तता करायला जाता त्याच कामांना विलंब होतो.
कर्क : तरी तूर्तास शांत राहा. धंदा व्यवसायात पैशाची चणचण भासेल. परंतु हितचिंतकांची मदत होईल.
सिंह : जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रीत करा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. कामांना वेग येईल.
कन्या : मनाविरुद्ध काम करावे लागले तरी रागावू नका. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा. साहस धाडस करू नये.
तूळ : घरात घरखर्चाच्या कारणाने पैसे खर्च होतील. समारंभ, लग्न, इ. कारणाने आप्तेष्ट नातेवाईक भेटतील.
वृश्चिक : घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुमची तारांबळ होईल.
धनू : धंदा व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्या. गृहसौख्य उपभोगाल.
मकर : रेंगाळलेल्या कामांना प्राधान्य देऊन ती संपवण्याचा चंग बांधा. कामाचे आर्थिक स्वरूपात फळ मिळेल.
कुंभ : नोकरीत कामाचा दर्जा उंचावेल. नवीन प्रशिक्षण व कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील.
मीन : घरात कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल. शुभ समारंभ ठरतील. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.