आजचे भविष्य ( सोमवार, ३ मे २०२१)

मेष : या सप्ताहात तुम्हाला माणसांची पारख चांगली कळेल. स्वप्न व सत्य यातील फरकही लक्षात येईल.

वृषभ : व्यवसायात मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कामात बदल करावा लागेल.

मिथुन : हाती असलेल्या कामांना गती मिळेल. नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही.

कर्क : बेकार व्यक्तींना नवी नोकरीची चांगली संधी दृष्टीक्षेपात येईल. घरात नवीन खरेदीचे बेत सफल होतील.

सिंह : तरुणांना कर्तृत्व दाखवण्यास वाव मिळेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. रागावर नियंत्रण ठेवावे.

कन्या : पैशाची तजवीज करुन ठेवावी लागेल. महत्वाचे ग्रह अनुकुल आहेत तेव्हा फायदा घ्या. दगदग पात्र टाळा.

तूळ : व्यवसायात कामांना प्राधान्य देऊन त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करा. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील.

वृश्‍चिक : नवीन गुंतवणूकीचे विचार मनात येतील. महिलांना छंद जोपासता येईल. मुलांच्या बाबतीत समाधानाने रहाल.

धनु : नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? याची काळजी घ्या. अतिविसंबून राहू नका.

मकर : आपले काम बिनचूक करा. घरात प्रवासाचे बेत ठरतील. शुभकार्येही ठरतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल.

कुंभ : सर्वजण कौतुकही करतील. त्यामुळे कष्टाचे चीज होईल. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील.

मीन : विरोधकांचा विरोध मावळेल व ते तुमच्या कलात उचलून धरतील. नोकरी कामाचा झपाटा राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.