मेष : परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या ध्येयधोरणात बदल केलात तर त्याचा लाभ होईल. मनोबल उंचावेल.
वृषभ : व्यवसायात पैशाची चणचण जाणवली तरी तात्पुरती पैशाची सोय होईल. वायफळ खर्चावर बंधन ठेवा.
मिथुन : नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत नवीन करार होतील. काही ठोस निर्णय घेता येतील.
कर्क : नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल. कामाचा ताण कमी होईल. घरात वातावरण आनंदी राहील.
सिंह : मुलांकडून अपेक्षित यश कळेल. प्रकृतीची साथ मिळेल. कलावंत खेळाडूंना क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
कन्या : महिलांनी अतिदगदग करू नये. तरुणांनी वरिष्ठांच्या मर्जीत राहावे. पैशाची आवक-जावक समसमान राहील.
तूळ : व्यवसायात जी कामे हाती घेतली होती त्यांना वेग येईल. आर्थिक स्थिती बरी राहील.
वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल; परंतु न रागावता काम करीत राहा. आपले छंद जोपासून मन गुंतवावे.
धनू : घरात तरुणांना विवाहासंबंधीचे निर्णय घेणे कठीण होईल. थोडी सबुरी ठेवा.
मकर : भावनिक चढउतार, वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. कामासाठी जोडलेले संबंध संपुष्टात येतील.
कुंभ : तरुणांनी “”अति तेथे माती” ही म्हण लक्षात ठेवून सर्वांशी वागावे. महिलांना गृहसौख्य मिळेल.
मीन : तरुणांनी दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करावा. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. ग्रहमानाची साथ राहील.