मेष : नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करून कामे उरकाल. सहनशीलता बाळगून संघर्ष टाळावा.
वृषभ : पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत. याकडे विशेष लक्ष द्याल.
मिथुन : प्रकृतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी व तरुणांनी नाचरेपणा करू नये. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : द्विगुणित करणारी चांगली बातमी कळेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. धनलाभाची शक्यता.
सिंह : नोकरदारांना वरिष्ठांकडून व सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.
कन्या : परदेशगमनास उत्तम संधी चालून येईल. सणासुदीच्या खरेदीच्या गडबडीत महिलांचा वेळ जाईल.
तूळ : प्रियजन नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात टंगळमंगळ राहील.
वृश्चिक : व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी ओळखीचा उपयोग करून कामाचा विस्तार कराल. वादविवाद टाळावेत.
धनू : खेळत्या भांडवलासाठी बॅंका, पतपेढी यांची मदत घ्याल. आज रोख व उद्याही रोखच हे धोरण अवलंबाल.
मकर : नोकरीत सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाचे महत्त्व सहकारी व वरिष्ठांना कळेल.
कुंभ : घरात सुवार्ता कळेल. महिलांनी कामाचा ताण न घेता खुबीने इतरांकडून कामे करून घ्यावीत.
मीन : तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांनी मन एकाग्र करावे. यश हमखास मिळेल.