-->

आजचे भविष्य (सोमवार,१८ जानेवारी २०२१)

मेष : या सप्ताहात केलेल्या कामाचे श्रेय आणि मोबदला मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल.

वृषभ : कामात थोडी निराशा येईल. पण काम चालूच ठेवाल. व्यवसायात कामाचा वेग उत्तम राहील.

मिथुन : पैशाची चिंता मिटेल. सहकारी व हितचिंतकांची मदत होईल. हौसेने एखादे काम हाती घ्याल.

कर्क : नोकरीत अतिउत्साहाच्या भरात कोणतेही आश्‍वासन देऊ नका. ते पूर्ण करावे लागेल. कामात धीर धरा.

सिंह : सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करा. एखाद्या प्रश्‍नात तुम्ही ठाम रहाल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.

कन्या : प्रकृतीमान सुधारेल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी थोडा हात सैल सोडाल. घरात मंगलकार्य ठरेल.

तूळ : स्वकर्तृत्वावर विश्‍वास ठेवून कार्य करीत रहा. यश येईल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळेल.

वृश्‍चिक : कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. भांडवलाची तरतूद झाल्याने प्रगतीपथावर रहाल.

धनु : नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतील. वरिष्ठ कामात न मागता सवलत देतील.

मकर : परदेश व्यवहारांना चालना मिळेल. फावल्या वेळात तुम्ही तुमची रसिकता छंद म्हणून जोपासू शकाल.

कुंभ : महिलांना सभोवतालच्याव्यक्‍तींचे अंदाज अचूक येतील. काळानुरूप बदल कराल. चांगली बातमी कळेल.

मीन : व्यवसायात योग्य व्यक्‍तींची निवड योग्य कामासाठी करून फायदा मिळवाल. हातातील कामे पूर्ण होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.