आजचे भविष्य (सोमवार, 22 फेब्रुवारी 2021)

मेष : घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. तरीही सर्वांना समाधानी ठेवण्याचा तुमचा प्रयत्न राहील.

वृषभ : प्रकृतीचे तंत्र तेवढे सांभाळा. विवाहोत्सुक तरूणांचे विवाह ठरतील. पाहुण्यांची ये-जा राहील.

मिथुन : सर्वांना खुश ठेवताना स्वतःकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता आहे तरी प्रकृतीमान सांभाळा.

कर्क : वृद्धांना आप्तेष्टांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. तरूणांना नवीन अनुभव येईल. कामानिमित्ताने प्रवास योग.

सिंह : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवले तर फायदाच होईल. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल.

कन्या : प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करावीत. घरातील व्यक्‍तिंसमवेत छोटासा कार्यक्रम कराल.

तूळ : तरूणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने मनोबल उत्तम राहील.

वृश्‍चिक : नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळून तुम्हाला हव्या त्या सुविधा व मागण्या मान्य करून घ्या.

धनु : घरात प्रत्येकाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न राहील.तरुणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल.

मकर : प्रवासयोग संभवतो. अडीअडचणींवर मात करून यश मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील.

कुंभ : अडचणी अडथळ्यांवर मात करून यश मिळवण्याचा विशेष प्रयत्न राहील. कामात सहकारी मदत करतील.

मीन : कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. वातावरण आनंदी राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.