-->

आजचे भविष्य (सोमवार, 15 फेब्रुवारी 2021)

मेष : साध्या सरळ कामात झालेला विलंब सहन होणार नाही. त्यामुळे कामाचा उरक पाडाल. कामे मार्गी लावाल.

वृषभ : धावपळ दगदग वाढेल. नोकरीत प्रतिष्ठित व्यक्तिंचे तंत्र सांभाळून कामे कराल. संयम बाळगाल.

मिथुन : पोटाच्या तक्रारी कमी झाल्याने घरात कामे कराल. स्वच्छता, टापटीप राखण्यावर भर राहील.

कर्क : सहकुटुंब छोटीशी सहल काढाल. मन आनंदी राहील. “”अति तेथे माती” हे लक्षात ठेवून वागा.

सिंह : व्यवसायात दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःहून कामे ओढवून घेऊ नका. कामाचे वाटप करून कामे संपवा.

कन्या : नोकरीत प्रकृतीमान साथ देईल. त्यामुळे भरपूर प्रवास कराल. खाण्यापिण्याचे चोचले पुरवले जातील.

तूळ : एखादया मोठया कार्यक्रमानिमित्ताने आप्तेष्ट भेटतील. डोकदुखीही थांबेल. वातावरण चांगले राहील.

वृश्‍चिक : ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पहात होता व त्यात चांगली घटना घडल्याने तुमचा आत्मविश्‍वास वाढेल.

धनु : नव्या कल्पना मूर्त स्वरूपात आणाल. प्रतिष्ठित व्यक्तिंची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने हुरूप वाढेल.

मकर : नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. नवीन कामात लक्ष घालता येईल. प्रवासयोग संभवतो.

कुंभ : अनपेक्षित लाभाची शक्‍यता. घरात शुभसमाचार कळेल. प्रियजन आप्तेष्ट यांचे भेटीचे योग येतील.

मीन : छोटासा समारंभ आयोजित कराल. महिलांना मानसिक शांतता लाभेल. डोळयांचे आजार कमी होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.