आजचे भविष्य ( शनिवार, १६ जानेवारी, २०२१ )

मेष : नोकरीत वरिष्ठ दिलेल्या वचनांची पूर्तता करतील. नवी नोकरीची संधी उपलब्ध होईल. गुरु मदतीला येईल.

वृषभ : जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात लांबलेला कार्यक्रम निश्‍चित होईल.

मिथुन : मुलांकडून अपेक्षित यश मिळेल. आरोग्यात सुधारणा झाल्याने उत्साह वाढेल. तरुणांचे विवाह ठरतील.

कर्क : विनाकारण लांबलेली कामे आता गती घेतील. नवीन कामे नजरेच्या टप्प्यात येतील.

सिंह : अनपेक्षित पैसे हाती येतील. व्यवसायात तुमच्या तत्वाला मूरड घालून कामे कराल.

कन्या : नोकरीत वरिष्ठ एखादे पोकळ आश्‍वासन देऊन मागण्यांकडे दुर्लक्ष करतील. तरी रागावू नका.

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे थोडी धावपळ होईल. हाती असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करा.

वृश्‍चिक : घरात कितीही सुखसुविधा पूरवल्या तरी इतर व्यक्तींचे समाधान होणार नाही. गरजांना प्राधान्य दयाल.

धनु : व्यवसायात हितचिंतकांची मदत मिळेल. त्या बळावर अवघड कामात मुसंडी मारु शकाल.

मकर : विश्‍वासू व्यक्तिंवर कामे सोपवून तुम्ही तणावमुक्त व्हाल. महिलांनी तारतम्य राखून वागावे.

कुंभ : अडथळयांची शर्यत पार करता येईल. फायदा वाढवण्यासाठी महत्वाची योजना हाती घ्याल.

मीन : नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून कामे केलीत तर सहजसाध्य काम होईल. कष्टात बचत होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.