मेष : नोकरीत अतिस्पष्टवक्तेपणा टाळा. वादाच्या प्रसंगापासून चार हात लांब रहा. नवीन कामे मिळतील.
वृषभ : जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. महिलांनी ऐकिव गोष्टींवर विश्वास ठेवू नये.
मिथुन : करमणूकीत वेळ मजेत जाईल. घरगुती समारंभ ठरतील. विद्यार्थ्यांना मनःशांती उत्तम मिळेल.
कर्क : व्यवसायात हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवाल. त्याप्रमाणे कामात बदल करून पुढचे बेत आखाल.
सिंह : पूर्वी केलेल्या कामातून आता विशेष लाभ होईल. नोकरीत उत्तम बदल घडून येईल.
कन्या : धनलाभाची शक्यता हातून सामाजिक व धार्मिक कार्ये पार पडतील. वाद व भांडणे सामंजस्याने सोडवावीत.
तूळ : विनाकारण झालेले गैरसमज दूर करावेत. छोटयाश्या सहलीचे आयोजन कुटुंबासमवेत करावे.
वृश्चिक : कामाचा वेग वाढेल. यशाची कमान उंचावेल. पैशाची स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील.
धनू : नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवली जाईल.
मकर : नवीन वास्तूत रहायला जाण्याचे योग येतील. महिलांना घरगुती कामातून यश मिळेल. आर्थिक लाभ होईल.
कुंभ : प्रियजनांच्या जीवनातील संस्मरणीय शुभघटना साजरे कराल. गुरू, शुक्र विशेष फलदायी ठरतील.
मीन : व्यवसायात उलाढाल वाढेल. महत्वाची कामे गती घेतील. हितचिंतकांची मदत होऊन नवीन कामे मिळतील.