मेष : नवीन घराचे स्वप्न साकार होईल. अनपेक्षित लाभ होतील. घरकामात महिलांचा वेळ मजेत जाईल.
वृषभ : विद्यार्थ्यांनी अभ्यासात दिरंगाई करु नये. ग्रह अनुकूल आहेत तेव्हा तुमचा उत्साह वाढता राहील.
मिथुन : व्यवसायात बदल करुन फायदा मिळवून देणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी येतील. नोकरीत वरिष्ठ महत्वीा कामे तुमचेवर सोपवतील.
सिंह : कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या दिमतीत जाईल.
कन्या : अभ्यासात मित्रांवर अवलंबून राहू नये. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क रहावे लागेल.
तूळ : व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कामे हाताळा. कामात गरजेप्रमाणे लवचिक धोरण ठेवा. नवीन खरेदी होईल.
वृश्चिक : वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करा. मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करुन घ्या. कामानिमित्ताने प्रवास घडेल.
धनू : गृहसजावटीसाठी पैसे खर्च करतील. मनाप्रमाणे कामे झाल्याने आनंद मिळेल.अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.
मकर : व्यवसायात अनपेक्षित बदल होतील. कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. आर्थिक प्रगती होईल.
कुंभ : तुमचे घेतलेले निर्णय अचूक ठरतील. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील.
मीन : कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. मिळालेल्या संधीचा फायदा घ्या.