-->

आजचे भविष्य (शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०२१)

मेष : नवीन वास्तू खरेदीचे योग येतील. गतीमान जीवन जगता येईल. यशाची कमान आनंद व्दिगुणीत करेल.

वृषभ : मानसिक शांतता मिळेल. व्यवसायात खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. कामे सुरू होतील.

मिथुन : नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळून काम उरका. महत्वाचे निर्णय घेताना योग्य सल्ला व संमती घ्या.

कर्क : जादा कामातून जादा पैसे मिळवता येतील. शक्ती युक्तीचा वापर करून कमी श्रमात जास्त यश मिळवाल.

सिंह : घरात इतरांच्या हट्‌टाखातर चार पैसे खर्च कराल व वेळही घालवाल. केलेल्या कामाचा लाभ आता मिळेल.

कन्या : तरूणांना संभ्रमात टाकणारे ग्रहमान तरी तूर्तास फारशी हालचाल नको. शुभकार्याची नांदी होईल.

तूळ : दोन्ही आघाडयांवर सतर्क ठेवणारे ग्रहमान आळस झटकून कामाला लागा. पैशाची चिंता मिटेल.

वृश्‍चिक : व्यवसायात दूरदृष्टी ठेवून घेतलेला निर्णय लाभदायी ठरेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या मागण्या मान्य करतील.

धनु : सकारात्मक दृष्टीकोन फायदा देणारा. जोडधंदयातूनही चांगली कमाई होईल. प्रिय व्यक्तिंचा सहवास मिळेल.

मकर : तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. मुलांकडून सुवार्ता कळेल. महिलांना कामाचा उरक दांडगा राहील.

कुंभ : स्वतःच्या तंत्राने कामाची आखणी करून कामे करा. व्यवसायात दक्ष राहून यश संपादन करा.

मीन : कार्यपद्धतीत केलेला बदल लाभ देईल. नोकरीत खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्या. शुभकार्य ठरतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.