मेष : नवीन योजना आखाल. तुमचे विचार मांडताना सभोवतालच्या व्यक्तिंची विेशासर्हता तपासून बघा.
वृषभ : अनावश्यक बदल करून खर्च कराल. योग्य ताळेबंद आखून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : नोकरीत मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा. कामे मनाप्रमाणे होतील. पाहुण्यांची ये-जा राहील.
कर्क : नवीन कामे ओळखीतून मिळतील. दुसऱ्यांवर विसंबून राहू नका. डोके शांत ठेवून निर्णय घ्या.
सिंह : व्यवसायात प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी बदल करावासा वाटेल. अभ्यासाची गोडी वाटेल.
कन्या : व्यवसायात तुमची महत्वाकांक्षा वाढत राहील. कामानिमित्ताने जादा सुखसुविधा मिळतील.
तूळ : प्राप्तीचे प्रमाण मनासारखे होईल मात्र मोठे खर्च करण्याची तयारीही ठेवा. जोडधंदयातून कमाई होईल.
वृश्चिक : व्यवसायात नवीन योजना, प्रकल्प डोळयासमोर असतील. त्यासाठी पूर्वतयारी कराल.
धनु : नवीन योजना हाती घेऊन प्रगती पथावर राहणे शक्य होईल. पैशाची चिंता नसेल.
मकर : नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील.
कुंभ : नवीन कल्पना मनात येतील. नोकरीत नवीन विचारांचा प्रभाव राहील. नवीन कल्पना मनात येतील.
मीन : नोकरीत उत्पन्नात भर टाकणारी संधी लाभेल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना काळ अनुकूल आहे.