-->

आजचे भविष्य (शुक्रवार,19 फेब्रुवारी 2021)

मेष : नोकरीत कामाचे कौतुक सर्वजण करतील. स्पर्धेला तोंड दयावे लागेल. चांगल्या कामाचा मोबदला मिळेल.

वृषभ : पैशाची तजवीज होईल. घरात मोठी खरेदी होईल. सुवार्ता कळेल. सहवासात वेळ मजेत जाईल.

मिथुन : सहकारी व वरिष्ठांना तुमचे म्हणणे कसे बरोबर आहे हे पटवू शकाल. प्रियजनांच्या सहवासाने आनंद मिळेल.

कर्क : सभोवतालच्या व्यक्तिंकडून अपेक्षा न ठेवता कामे उरका. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. घरात नवीन वाहन, जागा खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.

कन्या : वरिष्ठ कामाची जबाबदारी सोपवतील. घरात बजेटपेक्षा खर्च जास्त होईल पण तरीही समाधान वाटेल.

तूळ : प्रियजनांचा सहवास लाभेल.कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

वृश्‍चिक : मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याकडे कल राहील. घरात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य राहील.

धनु : घरात सर्वांच्या आवडीनिवडी जपाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल.

मकर : नवीन संधीसाठी तुमची निवड करतील. विचारापेक्षा कृतीवर भर ठेवलात तर कामाचा उरक पडेल.

कुंभ : घरात वातावरण आनंदी राहील. पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल. सुवार्ता कळेल.

मीन : गैरसमजूतीने होणारे वादविवाद टाळलेत तर सणांचा आनंद मिळेल. तात्विक मतभेद झाले तरी दुर्लक्ष करा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.