-->

आजचे भविष्य (शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०२१)

मेष : नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात सर्वांचे एकमत होणे कठीण जाईल. अवघड कामात यश मिळेल.

वृषभ : घरात शांतता राखण्यात यशस्वी व्हाल. तरूणांना मनपसंत जोडीदार भेटेल. कष्टाचे चीज होईल.

मिथुन : कामात सुधारणा झाल्याने तुमचा उत्साह वाढेल. सबुरीचे धोरण स्विकारल्याचा लाभ होईल.

कर्क : व्यवसायात प्रगतीचे पाऊल पडेल. पैशाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : नोकरीत वरिष्ठ जादा सवलतींसाठी तुमची निवड करतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल.

कन्या : जोडधंदयातून विशेष लाभ होईल. घरात सहजीवनाचा आनंद घेऊ शकाल. नवीन खरेदीचे बेत
ठरतील.

तूळ : महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. सहज वाटणाऱ्या कामात विलंब होईल.

वृश्‍चिक : जिद्‌द व चिकाटीच्या जोरावर कठीण कामात यश मिळवाल. जुनी येणी वसूल होतील.

धनु : वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढत नाहीत ना? लक्ष दया. कामामुळे जादा भत्ते व सवलत मिळेल.

मकर : घरात महत्वाच्या कामांना प्राधान्य दयाल. पैशाचे बाबतीत काटेकोर राहा. चांगली बातमी कळेल.

कुंभ : महिलांनी विनाकारण होणारी दगदग कमी करावी विद्‌यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा.

मीन : रटाळ/ कंटाळा (शब्दांना) यांना तुमच्या जीवनात थारा नसतो. त्यामुळे अविश्रांत कष्ट करून यश मिळवाल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.