सोलापूर विद्यापीठाच्या नूतन इमारतीच्या पायाभरणीचा आज समारंभ 

सोलापूर – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

हा कार्यक्रम गुरुवारी दुपारी एक वाजता विद्यापीठात होणार आहे. या कार्यक्रमास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, महापौर शोभा बनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठाच्या एकर परिसरात पहिल्यांदा पायाभरणी समारंभाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यानंतर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधतील.

गेल्या वर्षभरापूर्वी डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच विद्यापीठाच्या स्वतंत्र इमारतीचा प्रश्न मार्गी लावला. सध्या विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार हा ग्रंथालय इमारतीत चालतो. विद्यापीठास स्वतंत्र प्रशासकीय इमारत नाही. त्यासाठी डॉ. फडणवीस यांनी प्रयत्न करून नव्या इमारतीसाठी निधी मिळून त्या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. ठेकेदारास वर्कऑर्डरही देण्यात आले आहे. त्याच इमारतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पायाभरणी शुभारंभ करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.