आज पाचव्या टप्प्यातील मतदान

नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये उद्या (दि. 6 मे) मतदान होणार आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्‍मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्‍चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी हे मतदान होणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, स्मृती इरणी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, जतिन प्रसाद आणि सपा नेत्या पूनम सिन्हा या नेत्यांचे भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंदिस्त होणार आहे.

जम्मू-काश्‍मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदार संघात तीन टप्प्यात मतदान होत असून येत्या उद्या रोजी शोपियान, पुलवामा तसेच लेह आणि कारगील या मतदार संघात मतदान होईल. तर बिहारमध्ये सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारन आणि हाजीपूर या मतदार संघात मतदान होईल. राजस्थानात गंगानगर, बिकानेर, चुरू, झुनझुनू, सिक्कर, जयपूर (ग्रामीण), जयपूर, अलवार, भरतपूर, करौली-धोलपूर, दौसा आणि नागाऊर या 12 मतदार संघात मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेशात या टप्प्यात रायबरेली, लखनौ, अमेठी, यासारख्या महत्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.