मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला; अशोक चव्हाण यांची टीका

सोलापूर: ५ वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. भाजपच्या मुख्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान, मोदींच्या या पत्रकार परिषदेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. ‘देशात मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला’ असून, म्हणूनच 5 वर्षांनंतर नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर पत्रकार परिषद घ्यावी लागली आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले आहे.

अशोक चव्हाण आज सोलापुर दौऱ्यावर आहेत. राज्यातील दुष्काळ काँग्रेस उपसमिती अहवाल प्राप्त झाला असून त्यात राज्यातील भयानक परिस्थिती समोर आली आहे. दुष्काळाबाबत सरकारने आश्वासन दिले. मात्र, अंमलबजावणी केल्याचं दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त शब्दखेळ खेळत आहे. असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.