पुणे -शहरातील आजची बाधित संख्याही 321 इतकी आहे. मागील दहा दिवसांपासून बाधित संख्या वाढत असल्याचे दिसून येते. पावणेतीनशे ते पावणेचारशेच्या आसपास बाधित सापडत असून, ही संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. शहरात आज बाधित दर 3.99 टक्के आहे.
दिवसभरात 8 हजार 52 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ही बाधित संख्या सापडली आहे. तर आतापर्यंत तब्बल 27 लाख 78 हजार 674 नमुने तपासणीतून 4 लाख 83 हजार 520 जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आला.
त्यातील 4 लाख 71 हजार 909 बाधित करोनामुक्त झाले असून, आज दिवसभरात 432 बाधित करोनातून बरे होवून घरी गेले आहेत. गेल्या 24 तासात करोनामुळे 14 जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये शहर हद्दीतील 5 जणांचा समावेश आहे. सध्या सक्रिय बाधित संख्या 2 हजार 926 इतकी आहे.