#HBD : अभिनेते ‘मुकेश खन्ना’ यांचा आज वाढदिवस

मुंबई – टेलिव्हिजनवरील ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेले अभिनेते ‘मुकेश खन्ना’ यांचा आज वाढदिवस आहे. मुकेश खन्ना यांचा जन्म 23 जून 1958 ला मुंबई मध्ये झाला. त्यांनी 1984 मध्ये कलाविश्वात आपले पाऊल टाकले. सौगंध, तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

मात्र, ‘शक्तिमान’ या मालिकेमुळेच मुकेश खन्ना बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या दोन व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. यापूर्वी मुकेश खन्ना यांनी ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारून त्यांनी सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.