आज होणार वर्षातले पहिले सूर्यग्रहण; चुकूनही ही कामं करु नका…

पुणे –  या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण 10 जून म्हणजेच, गुरुवारी होणार आहे. सूर्यग्रहण दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी लागेल आणि संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपेल. अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध येतो, तेव्हा त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.

दरम्यान, यंदाचे हे पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण आशिया, युरोप, उत्तर कॅनडा, उत्तर अमेरिका, ग्रीनलँड आणि रशियामध्ये दिसणार आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी रिंग ऑफ फायर दिसून येईल.

2021 यावर्षी दोन सूर्यग्रहण दिसणार आहेत. पहिले सूर्यग्रहण 10 जून रोजी तर नंतरचे दुसरे सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी दिसणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.

ग्रहणात ही कामे चुकूनही करु नका…

1) सुतक कालावधी सूर्यग्रहणापूर्वी 12 तास आधी सुरु होईल.

2) हे सूर्यग्रहण वृषभ राशीत होणार असून, या राशीच्या लोकांनी या वेळी स्वत: ची विशेष काळजी घेतली पाहिजे.

3) सूर्यग्रहणाच्या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींनी वाहने चालविणे आणि धोकादायक कार्य करणे देखील टाळले पाहिजे.

4) सुतक काळात काहीही खाऊ नये. मान्यता आहे की याचा नकारात्मक प्रभाव पडतो.

5) सूर्यग्रहणाच्या वेळी कोणतीही पूजा करु नये. त्याने देवाच्या मूर्ती दुषित होतात.

6) सूर्यग्रहणावेळी सूर्याला थेट डोळ्यांनी पाहू नये. हे आपल्या डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकते.

7) सूर्यग्रहण सुरु असताना गर्भवती महिलांनी काहीही खाऊ-पिऊ नये. याशिवाय सुई-धागाही वापरु नये.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.