पक्‍क्‍या वाहन परवान्यासाठी आज, उद्या होणार चाचणी

पुणे – ज्या शिकाऊ वाहनचालकांना पक्‍क्‍या वाहनचालक परवान्यासाठी अपॉइंटमेन्ट मिळत नाही, त्यांच्यासाठी शनिवार (दि.18) आणि रविवार (दि.19) रोजी ड्रायव्हिंग टेस्ट अर्थात वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओअंतर्गत येणाऱ्या नागरिकांना हलक्‍या चारचाकी वाहनांच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी भोसरी येथील वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेत जावे लागते. येथे दररोज 200 ते 250 नागरिकांची ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. त्यामुळे सध्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे चित्र आहे. शिकाऊ परवान्याची मुदत सहा महिन्यांची असते.मात्र, मोठ्या वेटिंगमुळे अनेकदा शिकाऊ परवाना धारकांना अपॉइंटमेट मिळत नाही. त्यामुळे या परवानाधारकांच्या सोयीसाठी आरटीओकडून आयडीटीआरमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.